तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग सरांच्या ऑफिस मधला चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधे भेटलेला नवीन मित्र. भाग १९ भाग १८ वरून पुढे वाचा.... बबनने थोडा वेळ मित्राची वाट पाहिली, ओल्ड मंक ची बाटली त्यांच्याकडे डोळे वाटारून बघत होती. शेवटी कंटाळून त्यांनी एकट्यानेच सुरवात केली. दोन पेग पोटात गेल्यावर, त्यांनी समोर पाहीलं, जो माणूस समोर बसला होता तो पण त्याच्या कडेच बघत होता, त्यांनीच बोलायला सुरवात केली. चार पेग पोटात गेल्यावर दोघे घनिष्ट मित्र बनले. राजकारण, नागपूरचे रस्ते, ऑफिस मधल्या मुली हे सगळे विषय चघळून झाल्यावर, बबन म्हणाला “ अरे आपण इतकं सगळं बोललो पण