तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग सरांच्या ऑफिस मधला चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधे भेटलेला नवीन मित्र. भाग २० भाग १९ वरून पुढे वाचा.... कॉफी पिता पिता बबन म्हणाला “हे बघा गोखले साहेब, अशी दुर्मिळ संधी चालून आली आहे, हा नशीबाचाच भाग आहे, आयुष्यात एकदाच अशी संधी चालून येते. माझी अशी विनंती आहे की ती घालवू नका. विचार करा. तुम्हाला जी भीती वाटते आहे, तसं काही होणार नाहीये, अजून पर्यन्त कोणी वारसदार मिळालाच नाहीये, तुम्ही जर दावा पेश केला तर, तुम्हाला ही संपत्ती विनासायास मिळून जाईल.” “अहो, पण मी कसं सिद्ध करणार की मीच