"शोभा ss अय शोभाव ss!!"अशी हाक दाराच्या बाहेरून सकाळी आठच्या सुमारास कानावर पडली कीं समजायचं आज पौर्णिमा आहे.त्याकाळी "घरांची दारं" उघडीच असायची.आई किंवा मी दारात येणार आणि म्हणणार, " या मामा. ""सायब्या" माझ्या आजीकडून आणि वडिलांकडून ऐकलेलं ते नाव आणि ते नाव लावणारा तो वृद्ध. डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, त्यातून फुल पडल्यागत दिसणारे डोळे. लुकडी, कृष आणि पाचेक फूट उंची असलेली चण. रापलेला काळा रंग. अंगात पांढरा शर्ट त्यावर बिनबाहीचा कोट, खाली धोतर आणि डोक्यावर काळी टोपी. या व्यतिरिक्त पोशाखात मी त्याला कधीही पाहिल्याच मला स्मरत नाही.फक्त "या" ऐकलं कीं पायातलं जीर्ण पायताण काढून तो वृद्ध घरात यायचा आणि आत असलेल्या देवघराजवळ