तोतया वारसदार - भाग 30

  • 1.5k
  • 756

तोतया वारसदार पात्र रचना बबन                       सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले                 बबनचा बार मधला मित्र. भाग  ३०                   भाग २९  वरून पुढे  वाचा....   बबन आणि सुभाष गोखले, कॉफी हाऊस मधे बसले होते. बबन म्हणत होता, “गोखले साहेब, किती प्रयत्न केला संपर्क करायचा, पण तुम्ही तर अदृष्यच झाले होते. जवळ जवळ तीन हप्ते झाले, तुमचा काही निरोप नाही, भेट नाही, काय समजायचं मी? सगळंच आपल्या हातातून निसटतंय असं वाटायला लागलं होतं मला. एवढी मोठी संधी हातातून जाते की काय अशी भीती वाटायला लागली होती. काल जेंव्हा तुमच्याशी बोललो तेंव्हा जरा बरं वाटलं. मला आता सांगा की,  मागच्या वेळेस तुम्ही