तोतया वारसदार पात्र रचना वसंतराव परांजपे कावेरी गोखल्यांचे आताचे वंशज प्रभावती वसंतरावांच्या पत्नी त्र्यंबक वसंतरावांचे काका. गोविंद वसंतरावांचा धाकटा भाऊ. भाग ३३ भाग ३२ वरून पुढे वाचा.... “मग त्र्यंबक काका आत्ता नेमके कुठे आहेत? आम्ही कुठे शोधायचं त्यांना?” – निशांत. एक महिन्या नंतर काळजी वाटली म्हणून मीच वाराणसीला गेलो. तिथे अखंडानंद स्वामींच्या मठात ते राहत होते. दिवसभर त्यांची सेवा चालायची. बरं चाललं होतं. खुश होते. मग मी समाधानाने वापस आलो. त्यानंतर काही भेट नाही. आणि बोलणं पण नाही.” – वसंतकाका “म्हणजे आता त्यांची काय परिस्थिती आहे हे तुम्हाला पण माहीत नाही.” – रोहन.