तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र. भाग ३५ भाग ३४ वरून पुढे वाचा.... सुभाष सकाळी सकाळीच नागपूरच्या गणेशपेठच्या बस स्टँड वर होता. चंद्रपूरची बस अजून लागायची होती. त्याने कॅंटीन मधे जाऊन चहा घेतला. तिथेच एक कंडक्टर बसला होता, त्याला सहज सुभाषने विचारलं की चंद्रपूरची बस केंव्हा लागणार आहे म्हणून. तो म्हणाला की आत्ताच. ड्रायवर बस लावताच असेल. माझा पण चहा पिऊन झाला आहे. चला, तुम्हाला चंद्रपूरला जायचं असेल तर चला माझ्याच बरोबर. सुभाषचं आरक्षण होतं त्यामुळे चिंता नव्हती. सुभाष चंद्रपूरला पोचला तेंव्हा साडेबारा वाजले होते. बस स्टँड