रानभूल - भाग 3-4

  • 519
  • 249

रानभूलभाग ३ पाचही जण झपाझप पावलं उचलू लागले. वेळ खूप झालाय याच भान त्यांना आलं होतं. त्यांनी पुन्हा काठ्या उचलल्या.उताराच्या मार्गावर चालताना पाय घसरणीची शक्यता होती.सगळी जपून पावले उचलत होती.तेवड्यात वरच्या बाजूला सरसराट ऐकू आली.चार ते पाच प्राणी झुडपांतून धावत येत असावेत." हा कसला आवाज?" मनवेलने विचारले." बहुतेक डुक्कर असावेत. आपण त्यांच्या वाटेत आडवे आलो तर आपली खैर नाही." रोशनने सर्वांना सावध केले ." त्यांचे सुळे भयानक असतात. भले भले प्राणी त्यांनाघाबरतात." नासीर म्हणाला." सारखो भिययता." मनस्वी म्हणाली." जिथे आहात तिथे शांत उभे रहा." उदय म्हणाला.तेवढ्यात त्यांच्या डोक्यावरुन मघाचचा कोतवाल पक्षी कर्कश आवाजात ओरडत गेला.काही क्षण सगळे जीव मुठीत धरून