तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र. भाग ३६ भाग ३५ वरून पुढे वाचा.... “त्याची नका काळजी करू, कागद तयार असेल. पण काही, गरीबाला?” - दूसरा कारकून. असं म्हणून त्याने अंगठा आणि तर्जनीची पैसे, अशी विशिष्ट खूण केली. सुभाषने त्याला १५०० रुपये दिले. अविनाश हे नाव असलेलं सर्टिफिकेट दिलं. आणि तो निघाला. आठ दिवसांनी सुभाष पुन्हा चंद्रपूरला गेला. शाळेत त्या कारकुनाने सर्टिफिकेट तयार ठेवलं होतं ते ताब्यात घेतलं, त्याला बाकीचे १५०० रुपये दिले. आता त्याचं काम झालं होतं. चंद्रपूरला थांबण्याची काहीच गरज नव्हती. त्याने नागपूरची बस पकडली. आता