तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र. भाग ४० भाग ३९ वरून पुढे वाचा.... “चकरा मारल्या शिवाय बोर्डाचं काम होत नाही, मग काय करायचं?” – सुभाष. “ठीक आहे, मला डिटेल्स द्या, मला जसं जमेल, तशी मी चौकशी करून येत जाईन. मग तर झालं?” – बबनने आश्वासन दिलं. सुभाषने समाधानाने मान डोलावली, बबन आणि सुभाषची भेट होऊन जवळ जवळ आठ दहा दिवस झाले होते, एक दिवस दुपारी, मोकळा वेळ होता, आणि सारंग सर कोर्टात गेले असतांना बबन बोर्डाच्या ऑफिस मधे पोचला. चौकशी च्या डेस्क पाशी जाऊन रांगेत उभा राहिला. थोड्याच