स्वामीराया - सदैव पाठीशी

  • 78

सकाळची १० ची वेळ अनिरुद्ध ने गाडी थांबवली आणि कौलारू अश्या घराच्या गेट चा दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला त्याला समोर एक वयस्कर माणूस झाडांना पाणी देताना दिसला तो त्याच्या कडे गेला आणि म्हणाला  "नमस्कार वसंत काका  " "अरे अनिरुद्ध तू आणि इथे आणि कधी आलास परदेशातून " "झाले दोन दिवस काका कसे आहात "? "आहे बरा तू एकटाच आलास माधव आणि वाहिनी बरे आहेत ना "? "हो काका ठीक आहेत मी तुम्हाला भेटायला आलोय " "हो का ये आत ये असे म्हणून वसंत काका आणि अनिरुद्ध आत गेले " "बर बाळा काकू मंदिरात गेली आहे मी चहा टाकतो