आज Marine Drive ला भेटायचं ठरलं होतं. संध्याकाळी सात वाजता भेटायचं होतं, पण मी तिथे थोडा लवकरच पोहोचलो. समुद्राकडे पाहत तिची वाट बघत बसलो होतो. आसपास खूप लोक होते, पण ना मी कोणाला ओळखत होतो, ना कोणी मला.तेवढ्यात माझा फोन वाजला.“हॅलो?” मी फोन उचलत म्हणालो.“मी आलेय इथे… तू कुठे आहेस?” फोनमधून तिचा हलका आवाज आला.मी आजूबाजूला पाहत म्हणालो,“मी इथेच समुद्राकडे पाहत बसलोय. तू काय घातलंय?”ती हसत म्हणाली,“White shirt आणि sky blue pant घातलेला मुलगा दिसतोय मला… तो तूच ना?”मीही हलकंसं हसलो.“हो… आणि तू?”“थांब… आलेच.”मी मागे वळून पाहिलं.एक नाजूक मुलगी साध्या कपड्यांमध्ये माझ्याकडे चालत येत होती. तिची हलक्या पिवळ्या रंगाची कुर्ती