तोतया वारसदार - भाग 41

(116)
  • 1.6k
  • 792

तोतया वारसदार पात्र रचना बबन                       सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले                 बबनचा बार मधला मित्र.   भाग  ४१                  भाग ४० वरून पुढे  वाचा.... “पण सुभाष, हे सर्टिफिकेट तू चंदूला हाताशी धरून करून घेऊ शकतो, सारंग सर बोर्डात काही करू शकतील, असं मला वाटत नाही.” – बबन. “तो शेवटचा उपाय आहे. इथे नाहीच जमलं, तर तेच करावं लागेल. पण बबनराव, तुम्ही म्हणाला होता, की हे सर्व कोर्टाला सबमिट होणार आहे, आणि कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व संपत्तीचं वाटप होणार आहे, अश्या परिस्थितीत जर कोर्टाने सांगीतलं, की बोर्डाकडून प्रमाणित करून आणा, तर आपण सरळ  जेल मधे. ही एक फार मोठी रिस्क आहे,