तोतया वारसदार - भाग 42

  • 444
  • 180

तोतया वारसदार पात्र रचना बबन                       सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले                 बबनचा बार मधला मित्र.   भाग  ४२                   भाग ४१  वरून पुढे  वाचा.... “मला तुमचं म्हणण बरोबर वाटतंय असंच करा. आपल्या डोक्याला ताप नको. आधीच परीक्षा आणि निकालांचं खूप ओझं असत.” – साहेब. “ठीक आहे. पण साहेब मी त्याला पुढच्या बुधवारी त्याला बोलावलं आहे, तो आल्यावर त्याला काय सांगू?” – कारकून. “सांगून  टाका की शाळेला पत्र पाठवलं आहे म्हणून, पण नको. काय घोळ घातला आहे तुम्ही, सगळाच गोंधळ झाला आहे.” - साहेब. “साहेब असं करतो, तो आल्यावर त्याला सांगतो की शाळेला पत्र पाठवलं आहे म्हणून, आणि नंतर पाठवतो.