तोतया वारसदार - भाग 45

  • 114

तोतया वारसदार पात्र रचना बबन                       सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले                 बबनचा बार मधला मित्र. भाग  ४५                   भाग ४४   वरून पुढे  वाचा.... बबन सुभाषची वाट पहाट कॉफी हाऊस समोर थांबला होता. थोड्या वेळातच सुभाष आला. मग दोघं आत शिरले. “काय सुभाष, काम झालं का?” – बबन. “हो झालं एकदाचं. तू सुचवल्याप्रमाणे. जाऊन त्या क्लार्कला पटवलं. पण कामाचं स्वरूप  सांगीतल्यावर तोच हादरला. मग माझं काम खूप सोपं झालं.” – सुभाष. “त्याला भीती कशाची होती? त्याचं नाव तर कुठेच आलं नव्हतं.” – बबन. “अरे, त्याने जे सर्टिफिकेट बनवून दिलं होतं, तेंव्हा बडेबाबू सुट्टीवर होते, आणि आधी बडेबाबूंनी  नकार दिला होता.