गावाचं नाव सांगायला बंदी आहे, कारण तिथल्या ग्रामस्थांनी या जागेचा उल्लेख कुठेही न करण्याची शपथ घेतली आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव तसं शांत, पण गावाला लागून असलेल्या घनदाट जंगलाच्या मध्यभागी ती वास्तू उभी आहे. 'वास्तू' म्हणण्यापेक्षा तो एक सडत चाललेला जिवंत नरक आहे. १८व्या शतकात एका तांत्रिकाने स्वतःच्या अघोरी सिद्धीसाठी तिथे आपल्याच कुटुंबाचा नरबळी दिला होता. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात एका अधिकाऱ्याने तिथे आत्महत्या केली. लोक म्हणतात, तिथे जमिनीखाली फक्त माती नाही, तर शेकडो वर्षांचा आक्रोश गाडला गेला आहे.राहुल आणि समीर... दोघेही मुंबईचे. 'पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगर्स' (Paranormal Investigators) असल्याचा आव आणणारे दोन तरुण. त्यांच्याकडे महागडे कॅमेरे, ईएमएफ मीटर्स (EMF Meters), आणि