शापित गर्भ - जन्म की मृत्यू?

शापित गर्भ - जन्म की मृत्यू?लेखक : एक अश्वस्थामाअविनाश शांताबाई भिमराव ढळे---------------------------------------------काळाच्या पोटात असे काही गूढ दडलेले असते की ते उघड झाले, तर माणसाच्या विवेकबुद्धीचा पाया हादरून जातो. जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म यांमधील सीमारेषा जिथे पुसट होते, तिथे भयाचा जन्म होतो. ही कथा केवळ भुतांची नाही, तर पिढ्यान्‌पिढ्या वाहत आलेल्या शापाची आहे. ही कथा अशा एका आत्म्याची आहे, जिला मृत्यूनेही शांती मिळू दिली नाही.ही गोष्ट सुरू होते एका विस्मृतीत गेलेल्या खेड्यातून. नकाशावर जेमतेम नाव असलेले, पण अंधाराच्या कथा ज्याच्या प्रत्येक झाडाझुडपात साठलेल्या आहेत असे हे गाव. दिवसाच्या उजेडात हे गाव सामान्य वाटते, पण सूर्य मावळताच इथली हवा बदलते. वारा कुजबुजतो,