डोंबिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर सकाळी ९:१५ वाजता पाय ठेवायलाही जागा नव्हती. मध्य रेल्वेची ही सर्वात भयानक वेळ. प्लॅटफॉर्मवर उसळलेला तो मानवी समुद्र पाहून कोणाही नवख्या माणसाच्या छातीत धडकी भरेल, पण अभिमन्यू नवलेसाठी हा रोजचाच रणसंग्राम होता. कॉर्पोरेट जगतात वावरणारा, अंगावर नीट इस्त्री केलेला फॉर्मल शर्ट, पाठीवर लॅपटॉपची बॅग आणि कपाळावर घामाचे थेंब असलेला अभिमन्यू गर्दीच्या मध्यभागी उभा राहून मुंबईच्या देशाने येणाऱ्या फास्ट लोकलची वाट पाहत होता.लोकल अजून पूर्ण थांबलीही नव्हती, तोच प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीने आतल्या प्रवाशांना मागे ढकलत ट्रेनवर हल्ला चढवला. "चला, आत चला! पुढे सरका!" अशा किंकाळ्या हवेत घुमल्या. अभिमन्यूने स्वतःचा ताबा गर्दीच्या स्वाधीन केला. तो कसाबसा ट्रेनच्या