विलक्षण - 7

  • 111

विलक्षण ७(झुंबर आपल्या डोक्यावर पडले असते तर!या विचाराने तो खूप घाबरला होता.तो तिथून निघून आपल्या खोलीत गेला.)पुढे........     त्या रात्री त्याला स्वप्न पडलं दोन शुभ्र हात त्याच्या गळ्याच्या दिशेने येताहेत आणि त्याचा गळा दाबताहेत.तो घामाघूम होत जागा झाला.तो एवढा भेदरला होता की आजूबाजूला बघायचही धाडसही त्याला होईना.त्याने डोक्यावर चादर ओढून घेतली व झोपण्याचा प्रयत्न करू लागला. आपण दरवाजा खरच बंद केला का हे पाहण्यासाठी त्याने चादर दूर करत दरवाज्याकडे पाहिले.तिथे एक धूसर पारदर्शक आकृती उभी होती.तिचे हात हळुहळू त्याच्या दिशेने सरकू लागले.ते लांब झालेले हात अगदी त्याच्या गळ्यापर्यंत पोहचले.भितीने सूर्यकांत ओरडला पण त्याचा आवाज बाहेर पडला नाही.घशातच गुरगुरल्यागत आवाज आला व