महाराष्ट्राचे अपूर्ण स्वप्न

  • 363
  • 117

भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास आठ दशके झाली आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेलाही सहा दशकांहून अधिक काळ लोटला. या काळात महाराष्ट्राने उद्योग, शिक्षण, सहकार, विज्ञान, कला आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात देशाचे नेतृत्व केले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली, पुणे ज्ञाननगरी म्हणून उदयास आले आणि राज्यातील अनेक शहरांनी विकासाची झेप घेतली. मात्र या यशोगाथेच्या छायेत काही मूलभूत प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न हा त्यातील सर्वात जुना प्रश्न आहे. बेळगावसह मराठीबहुल भागांबाबतचा वाद अनेक दशकांपासून सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा चर्चेत येतो, पण अंतिम तोडगा अद्याप निघालेला नाही.विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास अनुशेष हाही राज्यासमोरील महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबई-पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राचा विकास वेगाने