तोतया वारसदार पात्र रचना निशांत शोधकर्ता दिनकर महादेव रावांचा चौथा मुलगा. सुधाकर गोखले निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले. सारंग, किरीट, प्रशांत ट्रस्टी भाग ४६ भाग ४५ वरून पुढे वाचा.... “ओके. तसं करू, मी चेक सारंगला देतो, बबन कॅश काढून ठेवेल. तूला जेंव्हा जमेल, तेंव्हा घेऊन जा.” – किरीट. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निशांतने नागपूर – दिल्ली आणि दिल्ली - वाराणसी अशी विमानांची टिकीटं बूक केली. वाराणसीला पोचल्यावर हॉटेल मधे जाऊन फ्रेश झाल्यावर निशांत विश्वनाथ मंदिरात गेला. दर्शन वगैरे आटोपल्यावर, त्याने अखंडानंद स्वामींच्या आश्रमा बद्दल चौकशी सुरू केली. बहुतांश लोकं बाहेर गांवांवरून दर्शनाला आले असल्याने, कोणाला