तोतया वारसदार पात्र रचना निशांत शोधकर्ता. सुधाकर गोखले निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले. भाग ४७ भाग ४६ वरून पुढे वाचा.... “अरे बापरे, दीड दोनशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, मी काय मदत करणार तुम्हाला? मला काहीच कल्पना नाहीये. सॉरी, मी तुम्हाला मदत नाही करू शकत.” – गोखले. “सर, तुम्हाला नसेल माहीत पण अजून कोणाला तरी नक्की माहीत असेल, मी कोणालाच ओळखत नाही पण तुम्ही काही नावं सुचवू शकता न, मी त्यांच्या कडे चौकशी करेन. मी संध्याकाळी येऊ का तुम्हाला भेटायला?” – निशांत. “या खटाटोपातून काही साध्य होईल असं मला वाटत नाही, पण या तुम्ही संध्याकाळी ७ वाजण्याच्या