तोतया वारसदार पात्र रचना निशांत शोधकर्ता. दिनकर सखाराम पंताचा भाऊ, महादेव रावांचा मुलगा. सुधाकर गोखले निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले. भाग ४८ भाग ४७ वरून पुढे वाचा.... दूसरा काही पर्याय नव्हता म्हणून निशांत हो म्हणाला. “मी केंव्हा येऊ ते सांगा म्हणजे त्या वेळेस येईन. नाहीतर मी यायचं, आणि तुम्ही ऑफिस मधे. असं नको व्हायला.” “सध्या माझी कारखान्यात पहिली पाळी सुरू आहे. मॉर्निंग शिफ्ट. मी तीन वाजल्यानंतर मोकळा आहे. तुम्ही तीन नंतर केंव्हाही या. नो प्रॉब्लेम.” – गोखले. उद्या दुपारी चार वाजता येईन असं सांगून निशांत बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी चार वाजता दुपारी निशांत गोखल्यांच्या घरी