तोतया वारसदार पात्र रचना निशांत शोधकर्ता. दिनकर सखाराम पंताचा भाऊ, महादेव रावांचा मुलगा. सुधाकर गोखले निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले. भाग ४९ भाग ४८ वरून पुढे वाचा.... “नो प्रॉब्लेम, तयारी नसती, तर मी एवढी मेहनत घेतलीच नसती. त्यांची चिंता तुम्ही करूच नका. एक मराठी माणूस एवढे कष्ट घेतो आहे, मला आनंद आहे. लागा तुम्ही कॅमेरा आणि स्टँडची व्यवस्था करायला.” – निंबाळकर. निशांत आणि गोखले खुषितच बाहेर पडले. हॉटेलवर गेल्यावर निशांतने सारंगला सर्व अपडेट दिलं. ऐकून घेतल्यावर सारंग म्हणाला, “मग आता काय करणार आहेस?” उद्या इथल्या मार्केट मधे जाऊन डिजी कॅम किंवा कॅमकॉर्डर मिळतो का आणि