तोतया वारसदार पात्र रचना बबन सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र. भाग ५२ भाग ५१ वरून पुढे वाचा.... त्या दिवशी, संध्याकाळी वातावरण कुंद झालं होतं आभाळ भरून आलं होतं. केव्हाही पाऊस पडायला सुरवात झाली असती. बबनला खूप जीवावर आलं होतं, पण सुभाषला भेटणं त्याच्या दृष्टीने आवश्यक होतं. म्हणून त्यानीच दुपारी फोन करून सुभाषला बोलावून घेतलं होतं. दुपारी कडक ऊन पडलं होतं आणि आकाशात मुळीच ढग नव्हते. पण नागपूरचा पाऊस असाच असतो. संध्याकाळच्या सुमारास, कुठून तरी अचानक ढग गोळा होतात, आणि पाऊस दमदारपणे कोसळायला लागतो. बबननीच मीटिंग बोलावली असल्याने, त्याचा नाईलाज होता. ठरल्या प्रमाणे