तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा चंद्रकांत गोखले - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर भाग ५३ भाग ५२ वरून पुढे वाचा.... “उद्या आपण इथल्या पटवारीला जाऊन भेटू. त्यांच्याकडे जमिनीवरचे सर्व जूने, नवीन उतारे असतात. बघूया काही शोध लागतोय का ते.” – निशांत. “ब्रीलीयंट आयडिया. वा निशांत, तू खरंच डिटेक्टिव आहेस, हे सिद्ध झालं आहे. पण हा पटवारी कुठे भेटेल?” रोहन. “ते काय, चार लोकांत चौकशी केल्यावर त्याची माहिती मिळून जाईल.” – निशांत. “चला म्हणजे आता मिशन पटवारी. गुड.” – रोहन.