ती मुलगी नकोच

  • 228
  • 87

15 वर्षांची मृण्मयी शाळेतून घरी आली आणि रागाने घरी येऊन... पळत आपल्या रूम मधे जाते..तिची आई आवाज देत असते पण ती तीच काहीच ऐकून घेत नाही...   तिच्या आई ला काहीच समजत नव्हते.. पण माहिती नाही अलिकडे ती खूप हट्टी आणि चिडचिडी झाली होती... तशी ती शाळेत खूप हुशार होती या २महिन्यात माहिती नाही खूपच कमी मार्क मिळाले होते..तसे तिचे आई वडील कधीच  तिच्या वर ओरडत नव्हते.. भले ही कितीही मार्क कमी मिळाले तरीही.. ती ही खूप समजदार होती.. अभ्यास ही खूप करायची पण माहिती नाही काय बिनसले आहे...तिची आई तिच्या मागे जाते आणि दरवाजा वाजवते.. दरवाजा आतून बंद केला होता...