तोतया वारसदार - भाग 60

  • 1.2k
  • 522

 तोतया वारसदार पात्र रचना बबन                       - सारंग सरांचा चपराशी सुभाष                      -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत                      - शोधकर्ता नयना                      - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर   अनिल                      - विश्रामचा चुलत भाऊ. सातारा. विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.     भाग  ६०            भाग ५९ वरून पुढे  वाचा.... तिकडे बबन मात्र अस्वस्थ होत होता. १२-१३ दिवस उलटून गेले होते पण अजून जाहिरात काही दिल्या गेली नव्हती. ते काम त्यालाच करायचं होतं आणि अजून सारंग सरांनी काही सांगीतलं नव्हतं. फोन वाजला. बबनने फोन उचलला. “सारंग वकिलांचं ऑफिस” तो फोन वर बोलला. “तिथे बबनराव आहेत का? मी त्यांचा