तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर अनिल - विश्रामचा चुलत भाऊ. सातारा. विनय - अनिलचा मुलगा सातारा. भाग ६१ भाग ६० वरून पुढे वाचा.... “बबनराव, खरंच सारंग सरांच्या तालमीत चांगले तयार झाले आहात तुम्ही. ठीक आहे तुम्हीच ताल माल बघा आणि मला सांगा, त्या प्रमाणे मी प्रगट होईन.” दोन दिवसांनी बबनने सुभाषला फोन करून संध्याकाळी भेटायला बोलावलं. संध्याकाळी कॉफी हाऊस मधे दोघं भेटले. “ठरलं का मी केंव्हा भेटायचं ते?” – सुभाषने विचारलं. तो