तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. विनय - अनिलचा मुलगा सातारा. भाग ६३ भाग ६२ वरून पुढे वाचा.... सारंग सर त्याच्या कडे आश्चर्याने बघत राहिले. निशांत इतक्या अधिकारवाणीने बोलू शकतो याचंच त्यांना नवल वाटलं. त्यांनी होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाले, “ओके बॉस. हुकूम की तामिल हो जाएगी।“ निशांतने घरी गेल्यावर विनयला सर्व गोष्टी खुलासेवार सांगितल्या. त्याला ऐकून धक्काच बसला.