तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. विनय - अनिलचा मुलगा सातारा. भाग ६४ भाग ६३ वरून पुढे वाचा.... “करेक्ट आहे, तो जर अविनाशचा मुलगा म्हणून क्लेम करतो आहे, तर ते खोटं आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. आणि त्याच्या करता त्याची संपूर्ण कुंडली आपल्याला माहीत पाहिजे.” – विश्राम. “आणि हे सर्व होई पर्यन्त, सर तुम्ही बबनला हात लावू नका