मुक्ता....??️ - 7 (अंतिम अध्याय)

             7.मला जगायचे आहे.....माझी मुक्ता वेडी नाही वेडे तर तुम्ही आहात... वेडे कसले कसाई आहात तुम्ही कसाई नीच पातळीचे लोक आहात तुम्ही. माझ्या सोन्यासारख्या लेकीच काय हाल केलं तूम्ही मरणाच्या दारात उभे केलं तिला आणि आता तिला वेडे ठरवताय. लांब रहा तिच्यापासून नाहीतर गाठ माझ्याशी आहे...... कळलं ते गरजले.त्यांचा राग पाहून तीची सासु घाबरली आणि दोन पाऊले मागे सरकली. पण.... पण.. पण...म्हणतात ना "विनाश काले विपरीत बुद्धी "विकास धावतच तिच्या बाबांच्या अंगावर धावून गेला आणि त्याची कॉलर धरून ओरडला...... ये म्हाताऱ्या माझ्या आईवर ओरडणार तू ..... आ sss तुझी लायकीतरी आहे का इतकी....(******)