यक्षनगरी मांगेली

  • 174

यक्षनगरी मांगेली     (   महाराष्ट्र -      कर्नाटक -गोवा सीमेवरील गाव)     ऑगस्ट महिना हा वर्षा सहली साठी एकदम उत्तम ! या दिवसात पाउस कमी असतो.मधे मधे कोवळे ऊन असते.अंगावर रोमांच उठवणारा वारा असतो. आम्ही ' मैत्रेय १९८२ 'विज्ञानशाखा आज ५/८/२०२६ वर बुधवारी असेच दोडामार्ग येथील मांगेली गावी गेलो. आमची ट्रॅव्हलरने झरेबांबर वरूनखोक्रल  येथून उजवीकडे वळत मांगेलीचा घाट चढायला सुरुवात केली.आकाशात सावळ्या ढगांनी गर्दी केली होती.रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांबूची बेट दिसत होती. शेतात व रस्त्याच्या कडेने स्वच्छ पाणी वाहत होत. इथे पाणी झऱ्यासारखे शेतातून वाहते म्हणून याला झरेबांबर म्हणत असावेत.पुढच्या सुखद दृश्य मालिकेची ही झलक होती.जसजसे आम्ही घाट चढत होतो