भिकारी ( भाग १ )

  • 333
  • 96

     सुहाला आज कॉलेज मधून निघताना नेहमीपेक्षा उशिर झाला होता. तिची बस निघून गेली होती . पुढील बस एक - दीड तासानंतर होती . इतका वेळ बसस्टॉप वर बसून वाट पाहण्यापेक्षा तिला स्टेशनवर बसून वाट पाहूया असे वाटले . म्हणून ती बसस्टॉप पासून स्टेशन कडे जात होती ..ती ज्या मार्गाने ने जात होती  तिथे एक ब्रीज लागत होता . तो  बसस्टॉप ते स्टेशन मार्ग जोडत होता . त्या मार्गावर बरेच प्रकारची लोक बसलेली दिसत असत . काही जण आपली ट्रेन, बस किंवा एखादी गाडी यांची वाट पाहत बसलेले दिसत होते. काहीजण उगीचच तिथे टाईमपास साठी बसलेले दिसत होते .