स्वप्नद्वार.... भाग 9 ( अंतारंभ) अगदी दोन्ही हात जोडून माफी असावी. हा भाग लिहायला खूप उशीर लागला म्हणून. पुढचा दीर्घ महाएपिसोड उद्या प्रकाशित होईल भाग 8 वरून पुढे " हेच ते वाक्य आहे जे मी त्या तळघरात वाचल होत " मार्दव स्वरात निशांत म्हणाला. " काय आहे ते वाक्य? " इतिहासतज्ञ संकेत यांनी कुतूहल असलेल्या नजरेने प्रश्न विचारला. त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता ओसंडून वाहत होती. विष्णगुप्त यांचा निराशाने झाकोळलेला चेहरा आता दिव्य तेजाने लुकलुकत होता. " जेथे बोचरा दाहक काळोख आहे तेथे त्याला चिरून भेदणारा पवित्र प्रकाशही आहे... जीथे असत्य आहे तिथे त्यावरुद्ध प्रचंड मजबुतीने उभ राहणार सत्यही आहे ... जीथे अधर्म आहे