स्वप्नद्वार - 9

स्वप्नद्वार.... भाग 9 ( अंतारंभ) अगदी दोन्ही हात जोडून माफी असावी. हा भाग लिहायला खूप उशीर लागला म्हणून. पुढचा दीर्घ महाएपिसोड   उद्या प्रकाशित होईल     भाग 8 वरून पुढे " हेच ते वाक्य आहे जे मी त्या तळघरात वाचल होत " मार्दव स्वरात  निशांत म्हणाला. " काय आहे ते वाक्य? " इतिहासतज्ञ संकेत यांनी कुतूहल असलेल्या नजरेने  प्रश्न विचारला. त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता ओसंडून वाहत होती. विष्णगुप्त यांचा निराशाने झाकोळलेला चेहरा आता दिव्य तेजाने लुकलुकत होता. " जेथे बोचरा दाहक  काळोख आहे तेथे त्याला चिरून भेदणारा पवित्र  प्रकाशही  आहे... जीथे असत्य आहे तिथे  त्यावरुद्ध प्रचंड  मजबुतीने उभ राहणार सत्यही  आहे ... जीथे अधर्म आहे