स्वप्नद्वार - 11

स्वप्नद्वार..... भाग 11 ( अंतारभ )  टीप :- या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे भाग 10 वरून पुढे.   " किती झंझावाती वळण घेतलंय माझ्या जीवनाने. कोण असतं या सर्व खेळांचा रचनाकार? काळाच्या पुलावरून शांतपणे चालतांना कुठलंतरी एक वाईट  स्वप्न पडावं .. भाबळ्या मनाने त्या स्वप्नांचा उलगडा करावा म्हणून त्या स्वप्नदुनियेत जावं. तर एक अद्भूतं अक्राळविक्राळ अमानवी शक्तीने वास्तविक जीवनात प्रवेश कराव.. . किती असीम, अनाकलनीय गोष्टी आहेत ह्या. जिथे विचारशक्तीचा अंत होतो तिथून काही गोष्टी सुरु होतात. जीवनाच्या एका अश्या वळणावर मी येऊन ठेपलोय  जिथे  जीवन आणि मृत्यदोरीवर माझा एक जरी  चुकीचा पाऊल  पडला तरी समोर मरणदरी आहे. काय असेल या लढाईचा