स्वप्नद्वार - 12

स्वप्नद्वार ...भाग 12     भाग 11 पुढे    " ती अमानवी शक्ती आहे तरी कोण ? " निशांतने परत तोच प्रश्न विचारला . त्याचा तो प्रश्न ऐकुन राजा वीरवर्धनच्या मनाचा उहापोह झाला . चेहऱ्यावर असलेल तेज क्षणातच कुठेतरी विरून गेल . निराशेचे   ढग त्याच्या चेहऱ्यावर जमले  होते. मनमंदिरात धुमसत असलेल्या भावना शेवटी अश्रुरूपी बाहेर आल्या . मृदू स्वरात राजा वीरवर्धन म्हणाला " ती अमानवी शक्ती आहे वर्धन घराण्यातील प्रचंड पराक्रम गाजवणारा...मायाजाल युद्धनीतीचा निर्माता ..माझा धाकटा बंधू म्हणजेच शक्तिवर्धन ".वीरवर्धनच्या आवाजाच्या लहरी खोलीत घुमू लागल्या होत्या ." काय ....पण हे कसं शक्य आहे ? " निशांत आश्चर्याने म्हणाला .त्याच्या  कपाळावर आठ्यांचं जाळ