सुहा विचारांमध्ये गुंतून गेली असताना मागून आवाज आला .. सुहा झालं का तुझं ? चल निघायचं आहे आपल्याला! सुहा स्वतःशीच म्हणाली ," निघायचं आहे ... खरंच ? मला हे सगळ दिसतंय तसं स्पष्ट वाटत नाही ...आणि आता इथून मी निघून जाणे हे मला योग्य वाटत नाही ...ती बरंच वेळ विचार करून झाल्यावर ती तिच्या मैत्रिणींना तिच्या मनातील शंका समजवून सांगण्याचा निर्णय घेते . ती सर्व मैत्रिणींना एकत्र बोलवून त्यांना ओम आणि ओम ची आई यांच्या सोबत ची पहिली आणि ही आता शेवटची भेट असा प्रवास सांगितला ...आणि म्हणाली हे सगळ व्यवस्थित समजून घ्यायचं आहे ..मला ओम ची आई