तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकर्ता विश्वंभर - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर. माधव - विश्वंभर – राजाराम – माधव. वसुंधरा - माधवची बायको. चिन्मय आणि विवेक - माधव ची मुलं. हेमांगी - चिन्मयची बायको. भाग ७१ भाग ७० वरुन पुढे वाचा ....... परस्परांची ओळख झाल्यावर, माधव म्हणाला, “हूं, मग निशांतराव, प्रथम तुमच्या कामाचं स्वरूप आम्हाला कळलं तर बरं होईल. कारण आमचं अजूनही असं मत आहे की इतक्या बारीक सारिक तपशीला करता कोणी नागपूर ते तंजावर असा प्रवास करणार नाही. ही माहिती फोन करून तुम्ही सहज घेऊ शकत