जुळले नाते खेड्याशी....रिमझिम पाऊस सुरु होता. निवांत पावसाचा आनंद खिडकीतूनच घेत होतो. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. क्षणभर बिचकलोच. माझे जेष्ठ चुलत भाऊ दिर्घकाळापासून आजारी होते. त्यांचं काही बरं वाईट तर झालं नसेल या भावनेनं चिंताग्रस्त झालो. पण तसं काही कळलं नाही. संदेश आनंदाचा होता. माझ्या भावांनी शेतात सहभोजन आयोजित केलं होतं.त्याबद्दल बोलावणे होते. गावी माझी शेती व घरही नव्हते. केंव्हाच ती मी विकली होती.पण आपुलकी ने व प्रेमाने बोलाविल्याने जावे लागत होते. लगेच तयारी सुरु केली. सोपा आणि जलद समृद्धी मार्ग जायला निवडला. कारच्या प्रवासासाठी नातू ही तयार झाला. आमची नवीन Tata Nexon भन्नाट पण नियंत्रित वेगाने समृद्धीवर धावत होती.