द्वितिय महायुद्ध - भाग 9

  • 135

हिटलर सत्तेत आल्यावर त्याने लोकशाहीला जाळून खाक केले होते. त्याच्या SS सैनिकांनी आणि 'गेस्टापो' (Gestapo - गुप्तहेर पोलीस) ने संपूर्ण जर्मनीमध्ये दहशतीचे असे जाळे विणले होते की, लोक स्वतःच्या घरातही भीतीने कुजबुजत असत. पण जसजशी नाझींची ताकद वाढत गेली, तसतशी हिटलरच्या शत्रूंची यादीही मोठी होत गेली. सुरुवातीला कम्युनिस्ट, नंतर पत्रकार, राजकीय विरोधक आणि पुढे जाऊन ज्यू (Jews) नागरिक... या सर्वांना पकडून ठेवण्यासाठी जर्मनीतील साधे तुरुंग अपुरे पडू लागले होते. हिटलरला आता अशा एका जागेची गरज होती, जिथे या 'शत्रूंना' केवळ कैदी म्हणून ठेवले जाणार नाही, तर जिथे त्यांना जिवंतपणी मरण यातना दिल्या जातील! यातूनच मानवी इतिहासातील सर्वात काळ्या आणि भयानक