भाग १ : रक्त“आई…”दारावर तीन वेळा टकटक झाली.सुमित्राने डोळे उघडले.बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. घराच्या जुन्या कौलांवर पावसाचे थेंब एकसारखे आपटत होते.टक… टक… टक…“आई…”यावेळी आवाज स्पष्ट होता.विराजचा.सुमित्रा उठली.“काय झालं रे?”दार उघडताच विराज समोर उभा होता.त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचं तेच निर्विकार हसू.केस विस्कटलेले.हातात त्याचा लाकडी घोडा.“बाबा उठत नाहीत.”सुमित्राच्या पोटात गोळा आला.“कुठे आहेत?”विराजने हळूच बोट पुढच्या खोलीकडे केलं.“तिकडे.”ती धावत गेली.“शंकरराव!”काहीच उत्तर नाही.“अहो!”खोलीच्या फरशीवर त्यांचा देह पडला होता.डोक्याच्या मागून रक्त वाहत होतं.सुमित्राच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली.“मकरंद!”सगळं घर जागं झालं.पण विराज?तो दारातच उभा राहिला.हातातला लाकडी घोडा हलवत.“छुक… छुक…”मकरंद धावत आत आला.वडिलांना पाहताच त्याचा चेहरा पांढरा पडला.“बाबा…”त्याने खाली बसून नाडी तपासली.काहीच हालचाल नव्हती.“आई… मागे हो.”सुमित्रा भिंतीला