भिकारी ( भाग 3)

  • 882
  • 249

सुहा, जुई आणि इतर दोघी काही वेळातच मंदिरामध्ये प्रवेश करतात . सुहा सगळ्यांना एकदा एकत्र करून सांगते ,"आपण इथे का आलो आहोत किंवा आपण इथे का थांबलो आहोत ? हे फक्त आपल्यामध्येच राहणार हे लक्षात ठेवा !" सर्वांनी तिच्या बोलण्याला होकार दिला ..चौघी आतमध्ये जाऊन दर्शन घेतात आणि तिथेच मंदिरामध्ये बसतात. तिथे बरेच भक्त बसलेले होते .त्यांच्याप्रमाणे या ही तिथे बसल्या . तिथे आतमध्ये ओम चे वडील त्यांना दिसत होते . पण ओम नव्हता . सुहा तिच्या मैत्रिणींना म्हणाली , तुम्ही इथेच बसा ...मी ओम कुठे आहे हे बघते.. त्याच्यासोबत बोलायच आहे ...काही संशयास्पद वाटल तर मला आवाज द्या !