देवाचे ठाणे - 1

देवाचे ठाणे १( कथा पूर्णतः काल्पनिक आहे.) आज मी आपणहून एका संशोधनासाठी बाहेर पडली होतो.रत्नागिरी जिल्ह्यातील 'देवाचे ठाणे ' इथल्या कातळ शिल्प याबद्दल मी व्हिडिओ पाहिले होते व वाचलेली होते.माझ्या पुरातन वस्तूसंग्रहालयाची जबाबदारी मी आईवर सोपवली होती. आईला सुद्धा पुरातत्त्व विषयाची आवड होती. ती सहंग्रालयाला भेट देणाऱ्या लोकांना छान माहिती देते.अर्थात काही वस्तु माझ्या जवळ कश्या आल्या हे मी आईलाही सांगितले नव्हते.ते कळले असते तर तिने मला संशोधनच बंद करायला लावले असते. " तूझ्या सोबत काम करायला लवकरच हक्काचा माणूसआण."  ही नेहमीची सूचना करायला ती विसरली नाही.मी हसलो व म्हणालो.." हल्लीच्या मुलींना अश्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत."" कोणीतरी असेलच ना? मी किती दिवस