Devache Thane book and story is written by Balkrishna Rane in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Devache Thane is also popular in थरारक in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
देवाचे ठाणे - कादंबरी
Balkrishna Rane
द्वारा
मराठी थरारक
आज मी आपणहून एका संशोधनासाठी बाहेर पडली होतो.रत्नागिरी जिल्ह्यातील 'देवाचे ठाणे ' इथल्या कातळ शिल्प याबद्दल मी व्हिडिओ पाहिले होते व वाचलेली होते.माझ्या पुरातन वस्तूसंग्रहालयाची जबाबदारी मी आईवर सोपवली होती. आईला सुद्धा पुरातत्त्व विषयाची आवड होती. ती सहंग्रालयाला भेट देणाऱ्या लोकांना छान माहिती देते.अर्थात काही वस्तु माझ्या जवळ कश्या आल्या हे मी आईलाही सांगितले नव्हते.ते कळले असते तर तिने मला संशोधनच बंद करायला लावले असते.
देवाचे ठाणे १( कथा पूर्णतः काल्पनिक आहे.)आज मी आपणहून एका संशोधनासाठी बाहेर पडली होतो.रत्नागिरी जिल्ह्यातील 'देवाचे ठाणे ' इथल्या कातळ शिल्प याबद्दल मी व्हिडिओ पाहिले होते व वाचलेली होते.माझ्या पुरातन वस्तूसंग्रहालयाची जबाबदारी मी आईवर सोपवली होती. आईला सुद्धा पुरातत्त्व ...अजून वाचाआवड होती. ती सहंग्रालयाला भेट देणाऱ्या लोकांना छान माहिती देते.अर्थात काही वस्तु माझ्या जवळ कश्या आल्या हे मी आईलाही सांगितले नव्हते.ते कळले असते तर तिने मलासंशोधनच बंद करायला लावले असते." तूझ्या सोबत काम करायला लवकरच हक्काचा माणूसआण." ही नेहमीची सूचना करायला ती विसरली नाही.मी हसलो व म्हणालो.." हल्लीच्या मुलींना अश्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत."" कोणीतरी असेलच ना? मी किती दिवस
देवाचे ठाणे २( कथा पूर्णतः काल्पनिक आहे.)पुढे चालू...मी पार काळोख पडेपर्यंत काम करत होतो.खरतर मलारात्री तिथेच तंबू लावून राहायचे होते. त्या शिल्पा पासून २०फूटांवर एक छान जागा दिसली होती.तिथे पाणी नव्हतं.पण मला काही गोष्टी स्कॅन करायच्या होत्या.लॅपटाॅपवर काहीआराखडे तयार ...अजून वाचाहोते.माझा अंदाज होता की ते शिल्पकिमान दहा हजार वर्षांपूर्वीचे असावे.शिवाय माझ्या सिस्मोग्राफ मध्ये काही विचित्र कंपने दिसली होती.त्याचे विश्लेषण करायचे होते.त्यासाठी टेबल खुर्ची व लाईट लागणार होती.म्हणून मी त्या रात्री खाली गावात राहायचे ठरवले. मी माझं सगळं सामान आवरलं .मी गाडीवरून खाली उतरलो.चौकशी करता कळलं की गावात एकच होम स्टे होता. मी तिथे पोहचलो.ते एक मजली घर होतं.खाली बाहेरच्या रुममध्ये
देवाचे ठाणे ३आम्ही दोघ दोन दिशांना गेलो.ती फुलांच्या ताटव्यात शिरली.मी उजवीकडे वळलो.मला अजून पाच एक मिनिटे चालावं लागणार होतं.चालता चालता माझं लक्ष काल रात्रीच्या त्या आंब्याच्या कलमाकडे गेले. मी सहज तिथे गेलो.कालच्या दो-या...फाटक शर्ट..बोळा तिथेच होता.पण त्या सोबत आणखी ...अजून वाचाअचंबित करणा-या गोष्टी तिथे होत्या.एक आयफोन व एक हजार रुपये एका कागदावर ठेवलेले होते. मला कळेना की हे काय गौडबंगाल आहे ते. काल रात्रीनिश्चितच तिथे फोन व पैसे नव्हते. मग आता कुठून आले ?जर चोरांनी राकेशला मारुन त्याच्याकडचा फोन व पैसेपळवले होते तर आता ते इथे कसे आले ते समजत नव्हते.मी सुजाताला हाक मारली पण तिला ती ऐकू आली नाही.ती
देवाचे ठाणे ४ मी माझं सामान गाडीला बांधून बाहेर पडलो.गाडीला किक्मारणार तेवढ्यात माझं लक्ष वर गॅलरीत उभ्या असलेल्या सुजाता कडे गेले.ती एकटक माझ्याकडे बघत होती.खरतर मी ठरवलं होतं की काही झाले तरी वर पाहायचं नाही पण शेवटी वर ...अजून वाचागेलेच होते.मी सहज राहायचं ठरवलं व हात हलवला.तिनेही हात हलवला. जर त्या सड्यावर एखादी अमानवीय शक्ती असेल तर ती रात्रीच्या वेळी सक्रीय होईल असा माझा कायास होता.शिवाय अफाट माळावर राहून आकाशातले तारे न्याहाळत रात्र घालवायची गंमत मला अनुभवायची होती.मी सड्यावर पोहचलो तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते.मी त्या कातळ शिल्पाला लागूनच असलेल्या उंचवट्यावर टेन्ट उभा केला.आत कोणताही सरपटणारा प्राणी शिरणार
देवाचे ठाणे ५ मी इन्स्पेक्टरची परवानगी घेतली व रुम वर परतलो.आंघोळ करून मी थोडी विश्रांती घ्यावी म्हणून बेडवरपहुडलो.काही काळ डोळे बंद करून तसाच राहिलो.अर्धा तास मी नुसता पडून होतो.मला झोपायच होत पणझोप येत नव्हती.काल रात्रीची घटना डोळ्यासमोर सारखीफिरत ...अजून वाचामी उठून ' धर्मानंद वर्मा ' माहिती मिळवायला सुरुवात केली.मोबाईलवर सर्च केल्यावर सुमारे सहा धर्मानंदवर्मा दिसले.मला हवा असलेला धर्मानंद वर्मा त्यातच होता.दिल्लीत केंद्रीय मंत्रालयात सचिव म्हणून त्याने तीन वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केले होते.त्याचे अनेक मंत्र्या सोबत व खासदारां सोबत मैत्रीचे व अर्थपूर्ण संबंध होते.निवृत्त झाल्यावर त्याच लक्ष कोकणातील जमीनींकडे गेले.त्यानेकोकणातल्या किना-या लगतच्या जमीनी खरेदी करायला सुरुवात केली.तो अत्यंत अधाशी व