देवाचे ठाणे - 3 Balkrishna Rane द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देवाचे ठाणे - 3

देवाचे ठाणे ३आम्ही दोघ दोन दिशांना गेलो.ती फुलांच्या ताटव्यात शिरली.मी उजवीकडे वळलो.मला अजून पाच एक मिनिटे चालावं लागणार होतं.चालता चालता माझं लक्ष  काल रात्रीच्या त्या आंब्याच्या कलमाकडे गेले. मी सहज तिथे गेलो.कालच्या दो-या...फाटक शर्ट..बोळा तिथेच होता.पण त्या सोबत आणखी काही अचंबित करणा-या गोष्टी तिथे होत्या.एक आयफोन व एक हजार रुपये एका कागदावर ठेवलेले होते. मला  कळेना की हे काय गौडबंगाल आहे ते. काल रात्री निश्चितच तिथे फोन व पैसे नव्हते. मग आता कुठून आले ? जर चोरांनी राकेशला मारुन त्याच्याकडचा फोन व पैसे पळवले होते तर आता ते इथे कसे आले ते समजत नव्हते.मी सुजाताला हाक मारली पण तिला ती ऐकू आली नाही.ती खाली वाकून डायरीत नोंद करत होती.मी वळून थोडा चाललो व पुन्हा हाक दिली.आता मात्र तिने वळून पाहिले.मी हात वर करून तिला बोलावलं." तिथं आंब्याखाली राकेशचा फोन व पैसे आहेत."" काय ?" ती जवळ जवळ किंचाळली.मी तिला घेऊन आंब्याजवळ गेलो.मी तिथले फोटो मारले. मग दोन्ही वस्तू उचलून मी तिच्याकडे दिल्या." पण हे कसं शक्य आहे?"" मलाही कळत नाही. हे अविश्वसनीय आहे."" काही असो...फोन परत मिळाला हे बरे झाले."      मी पुन्हा त्या मानव शिल्पाच्या दिशेने चालू लागलो.सुजाता सुध्दा माझ्या मागोमाग चालत होती. त्या कातळ शिल्पाच्या आसपास काही गुरे चरत होती.पण शिल्पा पासून काही अंतर ठेवूनच. आम्ही तिथे पोहचलो.तेवड्यात एक दिवड जातीचा साप सरसरत मानवशिल्पाच्या पाया कडून पुढे सरकत कमरेजवळ पोहचला.पण पुढे जे घडले ते एक नवलच होते. तो भला मोठा साप उचलून फेकतात तसा ताडकन उडाला व बाजूला जाऊन पडला.सुजाताने ते दृश्य कॅमे-यात टिपले." इथं काहीतरी अजब घडतंय असं तूला नाही वाटतं?"मी हसलो. असे कितीतरी प्रसंग मी यापूर्वी काही प्रसंगात अनुभवले होते पण तिच्यासाठी ते नवे होते." कदाचित तिथल्या तीव्र व बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे तो फेकला गेला असावा."" आणि राकेशचा फोन व पैसे त्याच जागी पुन्हा कसे आले?"" हे बघ आपण यावर नंतर विचार करुया."मी शिल्पाच्या दगडाच माझ्या स्कॅनरने स्कॅनिंग सुरू केले.त्या दगडात नेमके कोणते धातू आहेत हे शोधणे हा माझा हेतू होता.          सुजाता बाजूलाच कापरी कमळाचे फोटो घेत होती.बॉटनी मधलं तिचं ज्ञान जबरदस्त होत यात शंका नव्हती.आम्ही दोघ आप- आपल्या कामात गढून गेलो होतो.तेवड्यात चार पाच बायका फुले वेचण्यासाठी आल्या.त्यात एक वृद्ध महिला पण होती.मी आजूबाजूला आणखीकुठे शिल्पं खोदलेली आहेत का याचा शोध घेत होतो.मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं की आजूबाजूच्या सुध्दा अनेक कातळ असूनही त्या एकाच कातळावर शिल्प का खोदल गेलं होतं? तसेच त्या परीसरात इतर कातळांचा चुंबकावर कोणताही परिणाम होत नव्हता.मी त्या वृद्ध महिले जवळ पोहोचलो." काकी, हा सडा कधीपासून आहे?"" किती पिढ्या गेल्या सांगता येणार नाही."" याला देवाचे ठाणे का म्हणतात? सुजाता ने विचारले." माझे आजोबा सांगत, इथं  पूर्वी देवाचा मेळा दरवर्षी भरायचा."" बरं,ते तिथे असलेल शिल्पं कधी लक्षात आलं?"मी विचारलं." काही वर्षांपूर्वी एका गुराख्याच्या लक्षात आलं.""  ही सुंदर फूल?"" इथेच होती.पूर्वी कमी होती पण आता सगळा सडा भरलाय."" काकी,इथली फूल फक्त इथेच सापडतात.तुम्ही गावकरी भाग्यवान आहात."" अरे,मुला हे आता काही दिवसांचच आहे."" म्हणजे?"मी व सुजाताने एकाच वेळी विचारले." ते बघा तिकडे,जमीनीची मोजणी चाललीय."मी त्या दिशेने पाहिले. दूर सुमारे चारशे मीटर वर पंधरा ते वीस लोक सर्व्हे करत होती. ...वर ड्रोनही भिरभिरत होता.काही माणसांच्या हातात लाठ्या होत्या." कोण आहेत ही माणसं ?"" एका मोठ्या उद्योगपतींची असतं म्हणतत." ह्याचा अर्थ हा विस्तीर्ण माळ भूमाफियांच्या घशात जाणार आहे तर." रत्नकांत,हे थांबवलं पाहिजे."" आपण काय करू शकतो.?"" गावक-यांना एकत्र करून लढा द्यावा लागेल. इथली जैवविविधता...ते शिल्प हे सगळं युनिक आहे." "बरोबर आहे.पण झोपलेल्या ना जाग कसं करणार?"   मी विचार करत म्हणालो.सुजाताने थर्मास मधून आणलेली कॉफी मला दिली.जवळपास दुपार व्हायला आली होती. आम्ही पुन्हा आमच्या राहत्या जागी परतलो.     आल्यावर मी काकांची भेट घेतली." काका, सड्यावर आज सर्व्हे चालू होता तो नेमका कशासाठी?"" वर्मा नावाचा कोणीतरी उद्योगपती आहे. केंद्रातून सगळ्या हालचाली करतो. "" पण गाव वाल्यांनी विरोध केला नाही?"" आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केलीय. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केलाय. पण त्यांची पोहचखूप जास्त आहे. बरं गावातही एकी नाही.आमच्या कोकणाला शाप आहे.आम्हीच आमच्या पायावर धोंडा मारून घेतो. काही गावकरी त्यांना सामील झाले आहेत."" लवकर काहीतरी करावं लागेल."" हो,मी गेले पाच - सहा महिने झगडतोय. माझ्यावर दोनदा हल्ले झाले पण मी हाडाचा सैनिक आहे. निवृत्त झालो तरी अजून अंगात रग आहे."मी आश्चर्याने काकांकडे पाहतच राहिलो.माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला." आज सायंकाळी देवळात यावर सभा आहे."मी काही वेळ विचार केला." काका,सभेत मी बोललो तर चालेल?" " बोल.त्याने गावकरी जागे तरी होतील."   मी रुममध्ये परतलो. खरंतर गावातल्या जमीनीच्या भानगडीत पडणे म्हणजे जीवाशी खेळ होता.पण जागतिक वारसा ठरेल अशी जागा भूमाफियाच्या ताब्यात जाता नयेयासाठी काहीतरी करणे भाग होते. मी त्यासाठी एक प्रेझेंटेशन करायचे ठरवले.         तेवढ्यात सुजाता आली.मोकळे केस... कपाळावर मध्यभागी ठळक टिकली...सलवार - कमीज... चेहऱ्यावर गोड हसू...बघायचं नाही असं ठरवूनही मी तिला न्याहळल.मनावर उगाचच दडपण आल्यागत वाटल." काकांशी बोललास?"" अं...हं." मी थोडा गडबडलो." काय झालं?"" नाही...तो सड्याचा विषय..." मी वेळ मारून नेली.  मी तिला संध्याकाळच्या सभेबद्दल सांगितले." प्रेझेंटेशनसाठी मी तूला मदत करते. राकेश आता बरा आहे.तो ही मदत करेल."दुपारी आम्ही तिघांनी एक प्रेझेंटेशन तयार केले.त्यात सड्यावरची जैवविविधता...ते अनोखे शिल्पं...त्याच्यातील वैज्ञानिक रहस्ये...देवाचं ठाणे ह्या प्राचीन नावाची परंपरा... या सगळ्यामुळे गावाचं नाव जागतिक पातळीवर कसं पोहचलो आहे ते मांडलं.तसेच भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने काय करता येईल... भूमाफिया जमीन घेतात त्यावर नावाला एखादा उद्योग सुरू करतात व सबसिडी घेऊन नंतर बंदही करतात म्हणजे जमीनही जाते व नोकरीची ही शाश्वती नसते.हे सगळ मी व्यवस्थित त्यात मांडले होते. मी व सुजाता दोघांनी निवेदन केले होते.तर राकेशने तांत्रिक बाजू सांभाळली होती.       प्रेझेंटेशन तयार करताना मला काही गोष्टी कळल्या त्या म्हणजे राकेश हा कॉम्प्युटर इंजिनियर आहे. तर सुजाता हीमुंबई युनिव्हर्सिटीची बॉटनीतली गोल्ड मेडिलिस्ट आहे.तिला पुढच्या संशोधनासाठी स्कॉलरशिप मिळाली आहे.तिने आजपर्यंत तीन संशोधन प्रबंध भारतीय पर्यावरण विभागाकडे सादर केले होते. हे ऐकून मी चकित झालो होतो.पेहराव व बाह्य वर्तनावरुन कुणाची योग्यता ठरवू नये हेच खरं होतं. संध्याकाळी सभेला तीस लोक हजर होते.आम्ही केलेल्या प्रेझेंटेशनचा एवढा परिणाम झाला की गावक-यांनीशेवटी सड्याच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढण्याची शपथ घेतली.  आजची रात्र सड्यावर काढण्याचं मी ठरवलं होतं.जेवण झाल्यावर त्वरीत निघण्याची मी तयारी केली होती. माझी तयारी सुजाता बघत होती.ती मला रात्रीच्या वेळी सड्यावर न जाण्याची सूचना देत होती." तो परीसर निर्मनुष्य आहे.रानटी प्राणी तिथे भटकत असतात.शिवाय त्या वर्माची माणस दगा करु शकतात."मी फक्त हसलो." जाणारच असशील तर काळजी घे आणि हो मी आणि राकेश उद्या मुंबईला जाणार आहोत. एका बॉटॅनिकल गार्डनला  काही दुर्मिळ वनस्पती कश्या प्रिझर्व करायच्या त्याच प्रात्यक्षिक दाखवायचे आहे."ती काही क्षण थांबली.ती जाणार हे ऐकून मला बरं वाटलं होतं तसंच काही तरी हरवतय असंही वाटतं होतं पण ते काय आहे हे कळतं नव्हते.हे असं पूर्वी कधिच झाले नव्हते." खूप खुष होवू नकोस.परवा सायंकाळी पर्यंत मी पुन्हा येणार आहे.गावक-यांच्या लढ्यात सहभागी व्हायचं आहे."आपल्या खोलीकडे जाताना ती क्षणभर वळली..अधो नजरने माझ्याकडे बघत म्हणाली..." जातेय खरी...पण...पण...माझ्यातली 'मी 'इथेच तुझ्यापाशी ठेवून जातेय."मला कळेना तिला नेमकं काय म्हणायचं होतं ते._______********------*******---------*******----भाग ३ समाप्त बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026