देवाचे ठाणे २( कथा पूर्णतः काल्पनिक आहे.)पुढे चालू...मी पार काळोख पडेपर्यंत काम करत होतो.खरतर मला रात्री तिथेच तंबू लावून राहायचे होते. त्या शिल्पा पासून २० फूटांवर एक छान जागा दिसली होती.तिथे पाणी नव्हतं.पण मला काही गोष्टी स्कॅन करायच्या होत्या.लॅपटाॅपवर काहीआराखडे तयार करायचे होते.माझा अंदाज होता की ते शिल्पकिमान दहा हजार वर्षांपूर्वीचे असावे.शिवाय माझ्या सिस्मोग्राफ मध्ये काही विचित्र कंपने दिसली होती.त्याचे विश्लेषण करायचे होते.त्यासाठी टेबल खुर्ची व लाईट लागणार होती.म्हणून मी त्या रात्री खाली गावात राहायचे ठरवले. मी माझं सगळं सामान आवरलं .मी गाडीवरून खाली उतरलो.चौकशी करता कळलं की गावात एकच होम स्टे होता. मी तिथे पोहचलो.ते एक मजली घर होतं.खाली बाहेरच्या रुममध्ये