देवाचे ठाणे - 3

देवाचे ठाणे ३आम्ही दोघ दोन दिशांना गेलो.ती फुलांच्या ताटव्यात शिरली.मी उजवीकडे वळलो.मला अजून पाच एक मिनिटे चालावं लागणार होतं.चालता चालता माझं लक्ष  काल रात्रीच्या त्या आंब्याच्या कलमाकडे गेले. मी सहज तिथे गेलो.कालच्या दो-या...फाटक शर्ट..बोळा तिथेच होता.पण त्या सोबत आणखी काही अचंबित करणा-या गोष्टी तिथे होत्या.एक आयफोन व एक हजार रुपये एका कागदावर ठेवलेले होते. मला  कळेना की हे काय गौडबंगाल आहे ते. काल रात्री निश्चितच तिथे फोन व पैसे नव्हते. मग आता कुठून आले ? जर चोरांनी राकेशला मारुन त्याच्याकडचा फोन व पैसे पळवले होते तर आता ते इथे कसे आले ते समजत नव्हते.मी सुजाताला हाक मारली पण तिला ती ऐकू आली नाही.ती