शिवपुराणशौनक म्हणाले हे शिवजी, तुम्ही महा पंडित आहात. तुम्ही मला पुराणातील कथा सांगा. चांगले आचरण व भक्ती करुन विवेक कसा वाढतो व सज्जन लोक आपले विकारांवर नियंत्रण कसे ठेवतात ते सांगा.कलियुगात कल्याण करणारी व पवित्र अशी कथा सांगा आणि भगवान शंकरांची प्राप्ती कशी होईल ते सांगा. सूत म्हणाले तुम्ही धन्य आहात. मी तुम्हाला काळरूपी महासर्पाचा विध्वंस करणारे असे शिवपुराण सांगतो. हे स्वतः महादेवांनी सांगितले आहे. शिवपुराण हे परम श्रेष्ठ आहे. याच्या वाचनाने अथवा ऐकल्याने, यज्ञाने मिळते तेवढे पुण्य मिळते. हे दिवसातून एकदा थोडा वेळ ऐकावे किंवा शक्य नसेल तर पवित्र महिन्यात अवश्य ऐकावे. वाचन व श्रवण केल्यास उत्तम फळ मिळते. जिथे कथा वाचन होत