द्वितिय महायुद्ध - भाग 11

१९३४ मध्ये व्हेनिस भेटीत मुसोलिनीकडून झालेल्या अपमानानंतर, अ‍ॅडॉल्फ हिटलरने अत्यंत गुप्तपणे युरोपमधील सर्वात भयंकर लष्कर उभे करण्याचे काम सुरू केले होते. शस्त्रास्त्रांचे कारखाने रात्रंदिवस धडधडत होते. पण हे अवाढव्य लष्कर पूर्णपणे तयार होण्यासाठी त्याला काही वर्षांचा कालावधी लागणार होता. जर युरोपला किंवा अमेरिकेला या गुप्त लष्करी तयारीची भनक लागली असती, तर त्यांनी लगेच जर्मनीवर हल्ला केला असता. त्यामुळे, वेळ मिळवण्यासाठी हिटलरला संपूर्ण जगासमोर 'शांततेचे' एक मोठे नाटक उभे करायचे होते. त्याला जगाला पटवून द्यायचे होते की, "जर्मनी एक शांतताप्रिय देश आहे आणि मला युद्ध नकोय!" ही सुवर्णसंधी त्याला १९३६ च्या 'बर्लिन ऑलिम्पिक'च्या (1936 Summer Olympics) रूपाने मिळाली! (ऑलिम्पिकचे यजमानपद जर्मनीला